या चुका टाळा, आपोआप श्रीमंत व्हाल

आर्थिक श्रीमंती ही कोणाचीही मक्तेदारी नाही. श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत आई-बापाच्या पोटीच जन्म घ्यावा लागतो असे नाही. तर, त्यासाठी आवश्यकता असते सारासार विचार आणि योग्य गुंतवणूकीची. गुंतवणूक करताना काही गोष्टींचे भान राखले तर कोणीही श्रीमंत होऊ शकतो.

एकाच ठिकाणी गुंतवणूक टाळा
आर्थिक श्रीमंतीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकताना पहिलाच नियम लक्षात ठेवा. गुंतवणूक करताना कधीही एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका. भलेही तुम्ही गुंतवणुकीसाठी पारंपरीक मार्ग अवलंबत असाल तरी. पहिल्यांदा गुंतवणूकीचे ध्येय नक्की कारा. मग विवाह, मुलांचे शिक्षण, घर आदी गोष्टींसाठी वेगवेगळी रक्कम गुंतवत चला. या अशा गुंतवणुकीत अनेकदा व्याज कमी मिळते. परंतु, जोखीम कमी असते. तसेच, मिळणारा परतावाही सुरक्षीत असतो.

गुंतवणुकीसाठी उशीर
अनेकांना असे वाटते की, आता खूप उशीर झालाय. खरे तर आपण यापूर्वीच गुंतवणूक करायला हवी होती. आता सुरूवात करून काय उपयोग. पण, असे काही नसते. डोळस माणसाची वेळ कधी चुकत नाही आणि जातही नाही. अर्थात तुम्ही गुंतवणूक जितकी लवकर सुरू करता तेव्हा तुम्हाला त्याचा मिळणार फायदाही तितकाच मोठा असतो. अशा वेळी छोट्या कालावधीत अधिक परतावा देऊ शकेल अशा ठिकाणी गुंतवणूक करा. मात्र, अधिक परताव्यासाठी कोणताही गैरमार्ग अवलंबू नका. सरकारने आर्थिक प्रक्रियेतील कायदे कडक केले आहेत. गैरमार्गाने केलेल्या गुंतवणुकीमुळे थोड्याशा स्वार्थासाठी नसती आफत अंगावर येऊ शकते.

बॅंक खात्यात पडून राहिलेला पैसा
अनेकदा लोक बॅंकेत बचत खाते काढतात आणि येईल तो पैसा खात्यावर जमा करतात. असे केल्याने तुमचा पैसा सुरक्षीत राहण्याव्यतिरीक्त फारसे काही हाताला लागत नाही. त्यामुळे अशा सवयी टाळा. या पैशाला जास्त व्याज नसते. असे करण्याऐवजी तुम्ही लिक्विड फंड्स किंवा शॉर्ट टर्म्स बॉन्ड फंडात पैसे गुंतवून चांगला मोबदला घेऊ शकता.

विमा पॉलिसी
पूर्वी लोकांमध्ये इतकी जागृती नव्हती. त्यामुळे लोक विमा पॉलिसीकडे फार लक्ष देत नव्हते. पण, आता या क्षेत्रात चांगले पर्याय निर्माण झाले आहेत. त्यामुळे तुम्ही आपला फायनान्शिअली पोर्टफोलियो बनवताना विमा पॉलिसीकडे जरूर लक्ष द्या. लाईफ इन्शूरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नक्की काढा. पण, हे करण्यापूर्वी या पॉलिसी तुमच्या गरजा पूर्ण करतात का हेही तपासा.

टॅक्सवर लक्ष ठेवा
अनेकदा लोक आपल्यावर आयकर विभागाची वकृदृष्टी होऊ नये यासाठी सतर्क असतात. त्यासाठी ते टॅक्स काळजीपूर्वक भरतात. अगदी नियमीतपणे. पण, ते हे विसरतात की, टॅक्स रिटनही मिळतो. त्यामुळे टॅक्स भरताना अशा काही गुंतवणुकी शोधा की जिथून तुम्हाला टॅक्स रिटर्न मिळू शकेल.

सेवानिवृत्तीचा प्लान
आर्थिक सक्षम होत असताना केवळ घर, गाडी, मुलांचे शिक्षण आणि लग्न इतकेच नव्हे. तर, निवृत्तीचेही खास नियोजन करा. त्यासाठी १५ ते २० वर्षे आगोदरपासूनच आर्थिक नियोजन करा. जेनेकरून तुमचे वय वाढल्यावर तुम्हाला आर्थिक मदतीसाठी कोणावर अवलंबून रहावे लागणार नाही, अशा पद्धतीने गुंतवणूक केल्यास तुम्ही नक्कीच श्रीमंत बणू शकता.

 

– अण्णासाहेब चवरे |