बचत विरुद्ध गुंतवणूक

बचत आणि गुंतवणूक हे शब्द व्यवहारात वापरताना आपण बहुधा नेहमीच गल्लत करीत असतो. दोन्ही जणू एकच आहेत अशा समजुतीने बचत आणि गुंतवणुकीचा उल्लेख केला जातो. खरे तर, बचत आणि गुंतवणूक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये मोठा फरक आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

बचत म्हणजे?
• लहान कालावधीतील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी
• कमी परतावा (पैसे संथगतीने वाढतात)
• बचत म्हणजे भविष्यात उपयोग करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडच्या पैशांमधून बाजूला काढलेला एक भाग होय.
• हा बाजूला काढून ठेवलेला पैसा म्हणजे बचत. ती तुम्ही केव्हाही, गरज वाटेल तेव्हा वापरू शकता. हा पैसा तुमच्या खिशात एखाद्या प्रवाहाप्रमाणे कधीही अवतरू शकतो.
• गरज असेल तेव्हा कधीही तुमच्या बचत खात्यातील पैसा तुम्हाला उपलब्ध करून देणं हे बॅँकेचं कर्तव्य आहे. त्यासाठी बॅँकेकडे पैसा असणंही गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बॅँकेत ठेवलेल्या पैशाचा उपयोग बॅँक नफ्याच्या उद्देशानं दीर्घकाळासाठी करू शकत नाही. त्यामुळेच बचतीवरील व्याज अन्य तुलनेत नेहमी कमी असतं.
• बचत हा गुंतवणूक प्रक्रियेतील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी बचत असणं अत्यंत आवश्यक असतं.

गुंतवणूक म्हणजे?
• मोठी उद्दिष्ट पूर्ण करणे
• नफा मिळवण्याच्या दृष्टीने खर्च करणे.
• गुंतवणूक म्हणजे विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पैशाच्या वाढीसाठी केलेली प्रक्रिया असते.
• गुंतवणूक म्हणजे धोके आणि परतावा यांचा समतोल राखण्याचं एक कौशल्यच आहे.
• गुंतवणुकीद्वारे तुम्ही पत्करलेल्या धोक्याच्या मोबदल्यात तुम्हाला व्याज, डिव्हिडंड, बोनस किंवा नफ्याच्या रूपानं परतावा मिळतो.
• गुंतवणूक ही तुम्ही तुमच्या पैशाला कसे कामाला लावता याची गुणवत्ता आणि धोरण या आधारावर तयार केलेली प्रक्रिया आहे.
• महागाईवर मात करण्याचा गुंतवणूक हा उत्तम मार्ग आहे.

तुम्ही राष्ट्रीयकृत आणि खाजगी तसेच सहकारी बँका मधील Fixed Deposit Schemes, Recurring Deposit Schems, म्युच्युअल फंड मधल्या गुंतवणुकी, फिक्स माच्युरीटी बॉंड, Stock Market equity shares, Derivatives, Commodities, सोने , जमीन , अशा अनेक माध्यमातून जवळचा पैसा गुंतवता येतो आणि त्यावर आकर्षक परतावा मिळवता येवू शकतो.

प्रत्येक क्षेत्राला जसा एकाच वैश्विक सिद्धांत लागू असतो तसा या गुंतवणुकीच्या क्षेत्राला देखील तसा नियम लागू पडतो. जितका जास्त धोका पत्करण्याची तयारी तितकी मोठ्या किमतीचा परतावा!