गुंतवणूक करताना तुमचं लक्ष कुठे असतं ???

तुम्ही अनेक मानसं पाहिली असेतील ज्यांनी मार्केट मध्ये गुंतवणूक करून खूप मोठी संपत्ती उभी केली आहे. स्वतःच एक विश्व उभं केलं आहे. आणि अशीसुद्धा मानसं पाहिली असतील ज्यांनी मार्केट मध्ये गुंतवणूक केले आणि सारं काही गमावून बसले असतील.

ज्यांनी संपत्ती बनवली त्यांना त्यांच्या श्रीमंतीच कारण विचारलं तर त्यांनी याला जबाबदार मार्केट आहे किंवा मार्केटने कमावून दिले असे सांगतात आणि जे सारं काही गमावून बसले त्यांना त्यांच्या परिस्थितीच कारण विचारलं तर त्यांनी सुद्धा याला जबाबदार मार्केटलाच सांगितलं.

एका अर्थी दोघेही बरोबरच आहेत पण यासोबत एक गोष्ट अशी ज्याने खूप मोठा फरक घडवून आणला. तो म्हणजे ‘ध्यान’. लक्ष्य केंद्रित करण.

मी आपल्या मार्केट बाजारावर लक्ष्य केंद्रित करण्याबाबत नाही म्हणत!

चला बघूया आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करू शकतो.
१. धोका : आपण जिथे गुंतवणूक करता त्यावर असलेल्या संभावित धोक्यावर लक्ष ठेवू शकतो.
२. किंमत : ज्यामध्ये गुंतवणूक करतोय त्याच्या किमतीचा चढ-उतार यावर लक्ष ठेवू शकतो.
३. वेळ : सध्या ज्या गोष्टीत गुंतवणूक करत आहोत त्याचा परिणाम काय असेल? काम कसे आहे या गुंतवणुकीचे?, योग्य वेळ आहे कि नाही गुंतवणुकीची यावर लक्ष्य ठेवू शकता.
४. भावना : आपल्या भावनांवर नियंत्रण करू शकता. गुंतवणूक करावी कि नाही असे निर्णय घेताना भावनांवर ताबा ठेवून योग्य निर्णय घेता येतील यावर लक्ष ठेवू शकतो. जास्त परतावा मिळतो म्हणून पैसे काढून घेणे अशा भावनिक निर्णयांवर ताबा किंवा नियंत्रण आपण ठेवू शकतो.

पण तुम्ही परतावा किती मिळेल यावर लक्ष केंद्रित ठेवता आणि दुर्दैव हेच आहे कि ते तुमच्या हातात नाही. कारण या गोष्टीवर कोणाचाच ताबा नसतो. जे परताव्यावर लक्ष केंद्रित करतात त्यांना यश मिळेलच असे नाही. सर्वात जास्त धोका इथेच असतो.

जे बाजारातून चांगली संपत्ती बनवतात, पैसा बनवतात ते परताव्यावर लक्ष केंद्रित न करता संभावित धोका किती आहे ते पाहतात, येणाऱ्या धोक्याचा अभ्यास करतात. बाजाराचा चढ-उतावर लक्ष ठेवतात जेणेकरून योग्य किंमतीमध्ये त्यांना गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेतच झाली पाहिजे यावर लक्ष ठेवतात. विकत घेण किंवा किती कालावधीसाठी गुंतवणूक योग्य राहील यावर लक्ष ठेवतात. आपल्या भावनांना स्वतःवर आरूढ न करता, भावनिक न होता व्यावहारिक निर्णय घेतात. त्यामुळे त्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होते, योग्य तो मोबदला बाजारातून मिळवून घेतात.

त्यामुळे ज्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो त्यावर नक्कीच लक्ष केंद्रित करा.

आपला मित्र
समीर दत्ताराम पडवळ