आज याची योजना करा

अर्थवेध आयोजित ‘गुंतवणुकीची पाठशाळा’

लोकांमध्ये अर्थसाक्षरता आणि आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी

गुंतवणुकीची पाठशाळा – अर्थपूर्ण वर्ग

गुंतवणुकीचे उद्दिष्टे

तुमच्या स्वप्नांचं वेध घ्या… आम्ही स्वप्नपूर्तीसाठी मदत करू

सुखकर निवृत्ती

निवृत्तीनंतर काय…? खरं तर निवृत्तीनंतर आर्थिक दृष्ट्या आपली लाईफ स्टाईल चांगल्या पद्धतीने कशी जगात येईल असा उद्दिष्ट असावा.

मुलांचं शिक्षण

मुलांच्या शिक्षणाला आर्थिक मार्ग मोकळा करण्यासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद करणे हा उद्देश तुमच्या गुंतवणुकीला द्या.

मुलांचं लग्न

वाढती महागाई आणि भविष्यात वाढत्या खर्चासोबत मुलांचं लग्न धुमधडाक्यात करायचे असल्यास उत्तम पर्याय ‘गुंतवणूक’.

घराचं स्वप्न

साऱ्या कुटुंबाच्या डोळ्यात साचलेलं स्वप्न म्हणजे भविष्यात आपलं स्वतःच घर असावं यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवा.

वर्ल्ड टूरला जाणं

वर्ल्ड टूरला कुटुंबासोबत घेऊन जायचं आहे म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या स्वप्नासाठी गुंतवणुकीचं उद्दिष्ट असावं.

वैयिक्तक ध्येय

आपल्या आवडी-निवडी जपण्यासाठी, वैयक्तिक गोष्टींची पूर्तता करणे हे उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक करणे नेहमी चांगले.

Helping peoples achieve financial securities and peace of mind through sound financial planning since 2016.

“अर्थवेध” लोकांमध्ये अर्थसाक्षरता आणि आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी कार्यरत आहे.

वर्ष २०१६ मध्ये अर्थवेध’चा प्रवास सुरु झाला. अर्थवेध सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या आर्थिक जीवनात वाढ आणि संपत्ती निर्माण करण्याची संधी प्राप्त करून देते. सामान्य माणसासाठी एक व्यापक संपत्ती व्यवस्थापन व्यासपीठ प्रदान करते ज्यात आर्थिक विषयांची विस्तृत निवड आहे. आर्थिक घडामोडी आणि ग्राहक सेवेमध्ये उच्च पातळीच्या उत्कृष्टतेचे समर्थन केल्यामुळे अर्थवेध हे सुनिश्चित करते की त्याचे उपाय ग्राहकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतात.

आजची स्मार्टपणे केलेली ‘गुंतवणूकच’ आपले उद्याचे भवितव्य ठरवणार आहे. कारण २१ व्या शतकात आपण किती पैसे कमावतो यापेक्षा आपण कशा पद्धतीने आपला पैसा हाताळतो किंवा कुठे गुंतवतो यावर आपले आर्थिक जीवन अवलंबून आहे. कष्टाने कमावलेला पैसा योग्य पद्धतीने गुंतवून त्याचा योग्य वापर करण्यासाठी अर्थवेध मदत करते. तसेच माणसाची आर्थिक कुवत आणि धोका पत्करण्याची क्षमता यांचा अभ्यास करून योग्य गुंतवणूक करून देण्यासाठी अर्थवेध मदत करते.

हे कार्य करत असताना आम्ही आमच्या मूल्यांना आणि तत्वांमध्ये जपतो. सचोटी आणि प्रामाणिकपणा हा आमच्या व्यवसायाचा पाया असून आमच्या कामात नावीन्य आणि उत्कृष्टता जपण्यास आम्ही सज्ज आहोत.

गुंतवणूक का आणि कशी केली पाहिजे ?

सुरुवातीला संपूर्ण आथिर्क योजना तयार करा आणि त्यानंतर मोघम किंवा बाजारातील परिस्थितीनुसार उद्दिष्ट ठरविण्याऐवजी आथिर्क योजनेला अनुसरून स्वतंत्र गुंतवणूक उद्दिष्ट निश्चित करा. या दोन्ही बाबतीत व्यावसायिक आथिर्क सल्लागार मदत करतील.

सुनिल कानालसह संचालक - श्री कॉमर्स अकॅडमी

प्रत्येकाच्या आयुष्यात काहीना काही चढउतार होत असतात आणि त्यामुळे आपल्यासमोर आर्थिक संकट उभे राहते, अशी संकटे व्यवसायात, कुटुंबात येऊ शकतात जर आपले पुरेसे आर्थिक नियोजन नसेल तर आपली खूप हानी होऊ शकते, कर्जबाजारीपणा येऊ शकतो. हे होऊ नये म्हणून सर्वांनी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

अरुण सिंगसंस्थापक - वेल्थ गाईड

अर्थसाक्षरता ही उत्पन्न, खर्च, बचत, महागाई, गुंतवणूक संपत्ती व संपत्ती संवर्धनाचे विविध मार्ग यांचेशी निगडीत आहे. कालानुरुप या सर्वच घटकांमध्ये वेगाने बदल घडत आहेत. म्हणूनच आर्थिक नियोजनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. गुंतवणूक ही तरुण वयातच करायला सुरुवात झाली पाहिजे, म्हणजे ती दीर्घकालीन होते व आपल्याला अधिक परतावा जास्त काळ देते. प्रत्येक तरुण मुला-मुलीने त्यांच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून बचत आणि गुंतवणूक याचा विचार केलाच पाहिजे.

महेश चव्हाण संचालक - i4Investment Wealth Management

आयुष्यात चांगल्या सवयी लावून घेणे आणि त्या सातत्याने पाळणे हे खूप महत्त्वाचे असते, याबाबत कोणाचेच दुमत नसेल. हे काम सुरवातीला जरी अवघड वाटत असले तरी एकदा ते अंगवळणी पडले, की त्यातून मिळणारे फायदे खात्रीशीर असतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबतदेखील असेच आहे.

मनोज माळवेसंचालक - i4Investment Wealth Management

गुंतवणुकीचे निर्णय घेताना तुमची सध्याची आथिर्क परिस्थिती (गरज, वेळेचे उद्दिष्ट इ.) आणि जोखीम स्वीकारण्याची क्षमता माहीत असणे महत्वाचे ठरते. या दोन गोष्टी आथिर्क उद्दिष्ट आणि कोणत्या प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे हे ठरवतात.

जय पालशेतकरसंचालक - ग्लोबल इन्व्हेस्टमेंट

घरामध्ये पडून राहिलेल्या पैशाला जर योग्य गुंतवणूक दिली तर तोच पैसा तुम्हाला योग्य मोबदला कमावून देऊ शकतो. म्हणून पैशाला शांत बसून ठेवू नका, त्याला कामाला लावा आणि पैशापासून पैसा बनवा.

ज्योती आमटे - पडवळगुंतवणूकदार

अर्थवेध उपक्रम आणि सेमिनार

अर्थवेध आयोजित

गुंतवणुकीची पाठशाळा – अर्थपूर्ण वर्ग

जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि “रिच डॅड पुअर डॅड” पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणाच्या ३ पायऱ्या आहेत.

पहिली पायरी : शालेय शिक्षण
दुसरी पायरी : महाविद्यालयीन शिक्षण / व्यवसाय
तिसरी पायरी : आर्थिक शिक्षण

पहिल्या आणि दुसऱ्या पायरीचे शिक्षण देण्यासाठी हजारो शाळा आणि महाविद्यालये आहेत पण “आर्थिक शिक्षण” देण्यासाठी कोणतीच शाळा नाही. आणि त्यामुळे पैसा गुंतवायचा कुठे हा प्रश्न भेडसावत राहतो किंवा चुकीच्या किंवा फसव्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये आपण गुंतवतो.

0Days0Hours0Minutes0Seconds
 

म्युच्युअल फंडातील गुंतवणुक हि बाजारातील जोखमीचे अधीन असुन मागील कामगीरी भविष्यात तशीच राहिल अथवा रहाणार नाही. गुंतवणुक करण्यापुर्वी ऑफर डाक्युमेंट वाचुन व समजुन घ्यावे.